Sunday, May 4, 2025
Homeमुख्य बातम्याउद्योग जगताचे नियम शिथिल करा

उद्योग जगताचे नियम शिथिल करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्राचे उद्योग जगत मोठे करण्याकरता सर्व नियम शिथिल करा, उद्योग मोठा झाला तर आपोआपच राज्य मोठे होईल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

- Advertisement -

एमआयडीसी आयोजित ‘सीडीसीपीआर-2023’ कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 चे रिमोटच्या सहाय्याने समर्पण करून त्याच्या कायद्यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी सांगितले की, दावोस येथे 1 लाख 37 हजार कोटींच्या गुंतवणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्यातील 86 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आमच्या सरकारला यश आले आहे.

उद्योजकांचा सरकारवर विश्वास बसायला हवा असे काम सध्याचे सरकार करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य सरकारला पूर्ण पाठबळ मिळत आहे. राज्य शासन उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी पूर्णपणे सकारात्मक असून राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या काही सूचना असल्यास त्या आपण शासनाकडे पाठवाव्यात. या सूचनांची शासनस्तरावर दखल घेण्यात येईल. उद्योजकांना पूर्णपणे संरक्षित केले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. उद्योग क्षेत्रात पुरुषांसोबतच महिला उद्योजकांचा सहभाग वाढतांना दिसत आहे. महिला उद्योजकही औद्योगिक क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. राज्यात उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सवलती जाहीर केल्यामुळे उद्योगक्षेत्राची भरभराट होतांना दिसत आहे. नाशिकला उद्योगवाढीस भरपूर वाव असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी भविष्यात निर्माण होणार आहेत. .

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले कि, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने आपल्या राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,उद्योग मंत्री उदय सामंत,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खा. हेमंत गोडसे,आ.सिमा हिरे,आ.देवयानी फरांदे,उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी बिपीन शर्मा,निमा अध्यक्ष धनंजय बेळे,भाजप उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार आदी उपस्थित होते.

प्रास्तविक उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आभार एमआयडीसी च्या डेप्युटी सीईओ सोनाली मुळे यांनी मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

HSC Exam Result 2025 : विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या...

0
पुणे | Pune राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल (Result) कधी लागणार याकडे...