चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गिरणा धरण (girna dam) क्षेत्रात जोरदार पाऊस (Heavy rain) पडत असल्याने या पावसाने आधीच ९० टक्के भरलेल्या गिरणा धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. या विसर्गात सद्यस्थितीत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे आज गिरणा धरणातून तब्बल १५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
काल गिरणा धरणातून वाहणार्या विसर्गात आज ५००० क्युसेसने वाढ करण्यात आली असून सकाळी नऊ वाजता गिरणा धरणातून नदीपात्रात जवळपास १४,२५६ क्युसेस पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी ही वाढती आहे. गिरणातून पाण्याच्या विसर्गासाठी धरणाचे सहा वक्रव्दारे २ फुटाने उघडण्यात आली आहेत.
गिरणा धरणातून नदी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने ग्रामस्थांच्या सर्तकतेसाठी प्रत्येक ग्रामपंचाती मार्फत दवंडी व प्रसार माध्यमांच्या मार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी नदीवरील पुल व रहदारीबाबत दक्षता घेणेबाबत संबंधितांनी सावधान बाळगणेबाबत सूचना पाटबंधारे विभागातर्फे देणायात आल्या आहेत.
तालुक्यातील बहाळ येथल तीर्थक्षेत्र श्री ऋषीपांथा येथील गिरणा नदीवरील धोकेदायक पुलावर सरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरुन ये-जा करणे धोकेदायक आहे. त्यामुळे धोकेदायक पुलावरुन पाण्याचा विसर्ग कमी होईपर्यंत नागरिकांची, वाहनधारकांची, बैलगाडीने शेतात जाणारे शेतकरी बांधवांचा वापर थांबवणे बाबत स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासन यांना सूचना फलक लावणेबाबत मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी सूचना दिल्यात आहेत.