Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूतच्या ‘परंपरा’ डिजिटल दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

देशदूतच्या ‘परंपरा’ डिजिटल दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैनिक देशदूतच्या ‘परंपरा’या डिजिटल दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आज दीपक बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, आय स्क्वेअर ऑप्टिकलचे संचालक गौरव नावरकर, प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्‍व विद्यालयाच्या नाशिक प्रमुख वासंती दीदी, दैनिक देशदूतचे चेअरमन विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटेखानी समारंभात करण्यात आला.

- Advertisement -

देशदूत कार्यालयात झालेल्या या सोहळ्यास दैनिक देशदूतचे महाव्यवस्थापक आर. के सोनवणे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, इडीपी विभाग प्रमुख मयुरी कुलकर्णी, वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांच्यासह दिवाळी अंकातील लेखिका वंदना चिकेरुर, पुष्पा दीदी, डॉ.पवन हिंगणे, राजेंद्र उगले, वैजयंती सिन्नरकर, बाळासाहेब सोनवणे, राजन राजधर, रविना दीदी, मुक्ता बालिगा आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यानी दिवाळीचे महत्व विषद करताना दिवाळीच्या औचित्यावर ‘देशदूत’ने हा विशेष दिवाळी अंक डिजिटल स्वरुपात प्रसिध्द केला असल्याचे सांगितले. परंपरेचे महत्व सगळ्यांपर्यंत पोहोचावे, परंपरांकडे समाजाने सजगतेने पाहावे, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा गतवैभवास उजाळा मिळावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा हा हेतू असल्याचे नमूद केले.

यावेळी वासंती दीदी यांनी डिजिटल दिवाळी विशेषांकाने दिवाळीचे अध्यात्मिक महत्व जगभर पोहोचण्यास निश्‍चित मदत होणार आहे. विविध माध्यमातून भारतीय परंपरा लोकांपर्यंत जाण्याची संधी अशा उपक्रमातून मिळत असते. त्यामुळे  देशदूतचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दीपक चंदे यांनी समाजात अनेक वर्षांपासून रुढ असलेल्या आपल्या परंपरांची जाणीव नव्या पिढीला करुन देणे ही काळाची गरज आहे. ती या दिवाळी अंकाच्या माध्यमातून देशदूतने पूर्ण केली असल्याचे सांगितले. या विशेषांकामुळे आपल्या पंरपरांची उजळणी करण्याची संधी उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी वंदना चिकेरुर, वैजयंंती सिन्नरकर, राजेंद्र उगले यांनी परंंपरांच्या जतनाचे महत्व विषद करुन देशदूतच्या दिवाळी अंकाचे कौतूक केले. सूत्रसंचालन, स्वागत डीजीटल विभाग प्रमुख अनिरुध्द जोशी यांंनी केले.

या दिवाळी अंकात परंपरा म्हणजे अर्थातच आपल्या आयुष्याचे अनेकविध आयाम निभावण्याच्या पद्धतींवर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आहे. सोबतच परंपरा पुढच्या आयुष्याला कशा मार्गदर्शक ठरतात. यात आपले राहणीमान, जीवनशैली, खाद्यसंस्कृती, साहित्य, कला, पेहरावाच्या पद्धती, वागण्याच्या पद्धती, आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे.

दरम्यान, दै. देशदूतच्यावतीने दिवाळी निमित्त सुरांची मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रीय गायिका सुवर्णा क्षीरसागर व ओमकार कडवे यांनी शास्त्रीय संगीतावर आधारीत अभंगांंच्या माध्यमातून मैफलीत रंग भरला. त्यांना हार्मोनियमवर संस्कार जानोरकर तर तबल्यावर रसिक कुलकर्णी यांनी साथसंगत केली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या विविध अभंगांतील सौंदर्यस्थळांबद्दल संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या