Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : त्र्यंबकेश्वराच्या चरणी मोदींकडून सव्वा किलो सोने दान

Nashik News : त्र्यंबकेश्वराच्या चरणी मोदींकडून सव्वा किलो सोने दान

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी (Manoj Modi) यांनी त्र्यंबकेश्वराच्या (Trimbakeshwar) चरणी सव्वा किलो सोने आज दान (Donated) केले आहे. मोदी यांनी गत महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनार्थ भेट दिली होती. त्यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी मनोज तुंगार यांचा मनोज मोदी यांच्याशी परिचय झालेला होता. यावेळी मोदी यांनी त्र्यंबकेश्वरसाठी सुवर्ण दान करण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर आज त्यांनी आपले सहकारी हितेशभाई यांच्या मार्फत सव्वा किलो सोने दान देत संकल्प पूर्ण केला. या सुवर्णदानाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.

- Advertisement -

जवळपास दोनशे वर्षांपूर्वी असलेला त्र्यंबकेश्वरचा सुवर्ण मुखवटा नवीन बनवण्याचा संकल्प श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून (Trimbakeshwar Devasthan Trust) करण्यात आला होता. यापूर्वी मनोज मोदी त्र्यंबकेश्वर मंदिरात आले असताना त्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली होती. काही कारणास्तव मनोज मोदी यांनी येथे उपस्थित न राहता आल्याने त्यांनी त्यांचे प्रतिनिधी हितेश भाई यांना पाठवून हे दान दिले. सुवर्ण पट्टी आणि नाणे स्वरूपात हे दान असून जवळपास एक कोटी रुपये या सोन्याची किंमत आहे. यावेळी मंदिरात हितेश भाई यांनी सपत्नीक अभिषेक देखील केला.

देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानतून साड़ेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प विद्यमान ट्रस्ट मंडळाने वर्षभरापूर्वी केला होता.सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोने देवस्थानकडे जमा झालेले आहे.मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो अशी भावना आपल्या त्र्यंबकेश्वरच्या भेटीत व्यक्त केली होती. परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दान करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना १२५ तोळे दान करता येऊ शकते, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेशभाई यांनी सपत्नीक येऊन रीतसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले. त्यामुळे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर त्र्यंबकेश्वर मंदिरास (Trimbakeshwar Temple) सुवर्णदान मिळाले आहे.

दरम्यान, याप्रसंगी मनोज तुंगार व आर्यन तुंगार यांच्यासह मंदिरातील पुरोहितांनी हितेशभाई यांना आशीर्वाद दिला. तसेच हितेशभाई यांना सुवर्णदानाची पावती देत श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास घुले, रूपाली भुतडा,मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार, प्रदीप तुंगार, मंदिर पुजारी मनोज तुंगार, देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य व रश्मी जाधव हे उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...