अहमदनगर | प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर (Rotary Club of Ahmednagar) शाखेच्यावतीने एमआयडीसीत (MIDC) दिव्यांग कुटुंबियांसाठी उभारलेल्या ‘रोटरी निवारा’ (Rotary Niwara) या वसाहतीमधील सर्व घरे नूतनीकरणानंतर पुन:हस्तांतरण करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा चकाचक घरे हाती आल्याने दिव्यांग बांधवांच्या चेहर्यावर समाधान होते.
नूतनीकरणाचे काम महिन्यापूर्वी हाती घेण्यात आले होते. एका महिन्यात सर्व घरांचे नूतनीकरण पूर्ण झाले असून रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया (Dr. Prakash Kankaria) यांच्या प्रमुख उपस्थितीत घरांचे पुन:हस्तांतरण करण्यात आले. यावेळी अहमदनगर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अॅड.अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधाव, डॉ. सुधा कांकरिया, निंबळकच्या सरपंच प्रियांका लामखडे, सदस्य निलेश वैकर, सहाय्यक प्रांतपाल डॉ. दादासाहेब करंजुले, प्रकल्प प्रमुख महेश गोपालकृष्णन, हर्षवर्धन सोनावणे, रवी राउत आदींसह वसाहतीतील नागरिक उपस्थित होते. अंधसेवा मंडळाचे जेष्ठ सभासद संभाजी भोर यांनी सर्व घरांचे नूतनीकरण करून दिल्याबद्दल रोटरी क्लबचे (Rotary Club) आभार मानले.
अकोलेकरांनी अनुभवला आगळावेगळा स्नेह समारंभ
यावेळी डॉ.सुधा कांकरिया यांचे शुभेच्छा दिल्या. निंबळकच्या सरपंच प्रियांका लामखडे यांनी या वसहतीसाठी पथदिवे व रस्ता काँक्रिटीकरण कामे मंजूर केली असल्याची माहिती दिली. अंध सेवा मंडळाचे गोरख दरंदले यांनी सुत्रसंचलन केले. सचिव पुरुषोत्तम जाधाव यांनी आभार मानले. यावेळी नितीन सोनार, भाऊसाहेब भोसले, सुवर्णा भोसले, संजय कुताळ आदींसह नागरिक उपस्थित होते.
अहमदनगर रोटरी क्लबच्या वतीने 21 वर्षापूर्वी एमआयडीसीत रोटरी निवारा ही दिव्यांग बंधू भगिनींसाठी उभारलेली वसाहत हा जगातील अनोखा प्रकल्प आहे. या वसाहतीचा व रोटरी क्लबचा कायमचा ऋणानुबंध असल्याने सर्व घरांचे एक महिन्यात नूतनीकरण केले आहे. येथे झालेल्या रंगरंगोटीमुळे या नात्यात नवा रंग भरला गेल आहे.
– डॉ.प्रकाश कांकरिया
रोटरी क्लब व रोटरी निवारा वसाहत एकच परिवार आहे. त्यामुळे क्लबच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा येथे सतत दिल्या जात आहेत. या घरांचे प्राधान्याने नूतनीकरण करून नूतनिकृत घरे येथील बंधू भगिनींना पुन:हस्तांतरण करताना मोठा आनंद होत आहे.
– अॅड. अमित बोरकर