Saturday, July 27, 2024
Homeनाशिकयापुढे पाच रुग्णालयातच रेमडिसिव्हरचा इंजेक्शनचा साठा

यापुढे पाच रुग्णालयातच रेमडिसिव्हरचा इंजेक्शनचा साठा

नाशिक । Nashik

करोना संकटात रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या तक्रारी वाढत अाहे. त्या पार्श्वभूमीवर आता यापुढे जिल्हा रुग्णालयासह दोन महापालिका व दोन खासगी असे एकूण पाच रुग्णालयातच रेमडिसिव्हर इंजेक्शनचा साठा केला जाईल.

- Advertisement -

रुग्णालयांना रोज इंजेक्शन साठ्याची माहिती फलकावर द्यावी लागेल. तसेच या सर्व इंजेक्शनचा हिशेब ठेवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकार्‍याची नेमणूक केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी (दि.२५) झालेल्या करोना आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात ८८ टक्के करोना पाॅझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात हजार इतकी आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.६ टक्के असून तो आणखी खाली आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.

रेमडिसिव्हर अौषधाच्या तुटवडयाबाबत गंभीर दखल घेऊन यापुढे पाच रुग्णालयातच हे इंजेक्शन उपलब्ध असेल. त्याचा पुरेसा साठा उपलब्ध असावा यासाठी वरिष्ठ अधिकारी नेमण्यात येईल. जिल्ह्यात आॅक्सिजनचा देखील पुरेसा साठा आहे.

जिल्ह्याला २४२८ मेट्रिक टन आॅक्सिजन लागतो. आपल्याकडे ५५०० इतक्या मुबलक प्रमाणात आॅक्सिजन उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाचे सर्व अौषधे यापुढे जिल्हाप्रशासनच उपलब्ध करुन देईल असे त्यांनी सांगितले.

पक्षाचा निर्णय तीच माझी भूमिका

धनगर आरक्षणासाठी आज समाजाकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु आहे. याबाबत छेडले असता धनगर आरक्षणाबाबत पक्ष जी भुमिका घेईल तीच माझी भुमिका असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या