Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याअनधिकृत होर्डिंग हटवा; मनपा आयुक्तांचे आदेश

अनधिकृत होर्डिंग हटवा; मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipality) हद्दीत पुन्हा अनधिकृत होर्डिंगचा (Unauthorized hoarding) सुळसुळाट झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) अतिरिक्त आयुक्तांसह विभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून अनधिकृत फलक त्वरित हटविण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे विभागीय अधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करून सार्वजनिक शौचालय (Public toilet), मुतारी यांची पाहणी करून त्या ठिकाणी स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी, तसेच त्रुटी असल्यास दुरुस्ती करावी,

असेही आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी नुकतीच मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त आयुक्त शहर यांच्याकडे अनधिकृत होर्डिंगसह अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) तसेच अतिक्रमण (Encroachment) याकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे जे सेवक ठेकेदारी पद्धतीने काम करतात त्या ठेकेदाराची रक्कम अदा करण्यापूर्वी ठेकेदाराने सेवकांचे पीएफ (PF), विमा रक्कम सेवकांच्या खात्यात जमा केली आहे की नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयातील तसेच विभागीय अधिकारी कार्यालयातील जे अधिकारी व सेवक कामानिमित्त बाहेर जातात त्यांनी हालचाल वही मध्ये त्याबाबतची नोंद करून मुख्यालय सोडावे किंवा कार्यालय सोडावे अशी तंबी दिली आहे.

रामकुंड परिसरात अनधिकृत मासळी बाजार भरत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबत अतिक्रमण (Encroachment) उपायुक्त तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून कारवाई करावी, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या