Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : मानधन, भत्ते, वेतनासाठी 205 कोटी 14 लाख रुपये

Ahilyanagar : मानधन, भत्ते, वेतनासाठी 205 कोटी 14 लाख रुपये

सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिलासा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतन व सरपंच, उपसरपंचांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहायक अनुदान हिस्सा वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच यांच्या मानधन, सदस्य बैठक भत्ता इ. अदा करण्यासाठी आणि कर्मचार्‍यांचे किमान वेतन यासाठी वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद आठशे वीस कोटी छप्पन लाख रूपये मंजूर केले आहे.

- Advertisement -

त्यापैकी वित्त विभागाने आतापर्यंत 75% च्या मर्यादेत उपलब्ध करुन दिलेला 615.416 कोटी रूपये इतका निधी दि. 13 जून 2025, दि. 22 ऑगस्ट 2025 व दि. 30.डिसेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्या खात्यात वितरीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता याकरीता अर्थसंकल्पीय तरतुद रु. 820.56 कोटीपैकी एकूण वार्षिक तरतुदीच्या 100 टक्के यापूर्वी वितरित 75% (रु.615.416 कोटी) निधी वगळता रु.205.144 कोटी (25%) इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन 2025-26 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रु.205,14,40,000/- (रुपये दोनशे पाच कोटी चौदा लक्ष चाळीस हजार फक्त) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे किमान वेतन तसेच सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापी, सदर सहायक अनुदान अदा करण्यासाठी विकसित केलेली संबंधित प्रणाली सद्यःस्थितीत बंद असल्याने, सदर प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरळीत होईपर्यंत, सहायक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरीत करुन, जिल्हा परिषदेमार्फत संबधितांना अदा करण्यास संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, पंचायत राज, पुणे यांना पत्रान्वये मान्यता देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

हल्ला

इराणचा अमेरिकेवर गेल्या २४ तासांत जोरदार हल्ला; दोन लढाऊ विमानं पाडली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiगेल्या ३६ दिवसांपासून आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात गेल्या २४ तासांमध्ये जबरदस्त उलथापालथ दिसून आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये...