Friday, May 3, 2024
Homeनगरमानधन न मिळाल्याने होमगार्डची दिवाळी भाजी भाकरीत साजरी

मानधन न मिळाल्याने होमगार्डची दिवाळी भाजी भाकरीत साजरी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा सुव्यवस्था राखणे कामी मदत करणारे होमगार्डची तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नेमणूक केली जाते. सणावारांच्या वेळेस पोलिसांवरील ताण कमी व्हावा म्हणून होमगार्ड चोख सेवा बजावत असतात. मात्र या तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या होमगार्डचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने त्यांना दिवाळी भाजी भाकरीवरच साजरी करावी लागली.

- Advertisement -

कायदा व सुवस्थेला गालबोट लागू नये यासाठी होमगार्डची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केली जाते. कायमस्वरूपी काम नसल्याने कुठेतरी बाहेर काम करावे लागते तर ड्युटी मिळताच हातातले काम सोडून पोलिस ठाण्यात हजर व्हावे लागते. एखाद्या खाजगी ठिकाणी नोकरी करीत असेल तर ड्युटीवर आल्यानंतर कामावरून काढून टाकतात त्यामुळे होमगार्डचे हातचे काम जाते.

पोलीस स्टेशनला सक्तीने बारा तास काम करून घेतली जाते. होमगार्डला देखील परिवार आहे. वर्षाचा सण दिवाळी होऊन गेला तरी होमगार्डची गेली सहा महिन्यापासून मानधन नाही. त्यामुळे होमगार्डच्या परिवारांना भाजी भाकरी खावून दिवाळी साजरी करावी लागली आहे, अशी व्यथा होमगार्डकडुन मांडली जात आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मानधन देण्यात यावे, अशीही मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या