Saturday, July 27, 2024
Homeनगरडागडुजीअभावी लोखंडी फॉल धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर

डागडुजीअभावी लोखंडी फॉल धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी बांधलेल्या भंडारदरा धरणाच्या प्रवरा डाव्या कालव्यावरील अनेक दगडी बांधकामांना सध्या अवकळा आली असून नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव हद्दीत असलेला लोखंडी फॉल धबधबाही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

नगर अर्बनच्या सस्पेन्स घोटाळ्यात गांधी कुटुंबिय आरोपीच्या पिंजर्‍यात

ब्रिटिशांनी भंडारदरा धरणाच्या डाव्या कालव्यातील समप्रमाणात नियंत्रित करण्यासाठी ओझर ते बेलपिंपळगावपर्यंत आठ धबधब्यांची निर्मिती केली होती. अनेक ठिकाणी रस्त्यासाठी कालव्यावर पूल बांधले. 1915 साली बेलपिंपळगाव हद्दीत लोखंडी फॉलनजीक ब्रिटिशांनी शेवटचा दगडी धबधबा बांधला होता. आजमितीस या दगडी धबधब्याला 107 वर्षे पूर्ण झालेली आहे. बांधकाम सालाचा संगमरवरी शिलालेख या ठिकाणी आजही चांगल्या स्थितीत आढळतो.

येणे 24 लाख रुपये परत न दिल्याने साकुरीत व्यावसायिकाची आत्महत्या

इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या या धबधब्याला सध्या वड आणि पिंपळाच्या झाडांनी चोहोबाजूंनी ग्रासले असून झाडाच्या मुळांनी संपूर्ण दगडी बांधकामाला आपल्या कवेत घेतले असून अनेक ठिकाणी दगडं निखळून पडली आहेत. कालव्यातील पाण्याच्या प्रवालाही बाधा येईल अशारीतीने ही झाडे बहरलेली दिसत आहे. दगडी शिळाही आता कमकुवत झाल्याने हा कृत्रिम धबधबा शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. या धबधब्याचे पाटबंधारे विभागाने पुनरुज्जीवन करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांची गरज

पाटबंधारे विभागाचे बरेच प्रश्न निधीअभावी प्रलंबित आहेत. केटीवेअर दुरुस्ती, कालवा दुरुस्ती, शेतकर्‍यांच्या चार्‍या दुरुस्तीसाठी या खात्याला निधी उपलब्ध करून द्यावा. हे खाते प्रस्ताव सादर करण्याचे काम करू शकते, पण निधी मंजुरीसाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे परिसरातील शेतकरी बोलत आहेत.

प्रवरा डावा कालव्यावर आठ ब्रिटिशकालीन धबधबे आहेत. त्यांचा डागडुजीचा प्रस्ताव केलेला नाही. अजुनपर्यंत धबधब्यांचे कोणतेही दुरुस्तीचे काम केलेले नसून दगडात उगवलेली झाडे आवर्तनापूर्वी काढण्यात येतील.

– महेश शेळके शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या