Wednesday, May 29, 2024
Homeजळगावपारोळा तालुक्यात गोंडगाव घटनेची पुनरावृत्ती

पारोळा तालुक्यात गोंडगाव घटनेची पुनरावृत्ती

पारोळा । प्रतिनिधी parola

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतांनाच पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे या घटनेच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न झाला. सुस्त पोलीस प्रशासनाच्या विरोधात एकच लाट उसळली असून संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढत असतांनाच त्यातच गोंडगाव येथील घटना समोर असतांनादेखील हे अत्याचार करणार्‍या नराधमांना कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने असले कृत्य वारंवार होत आहेत. याविरोधातदेखील जनमाणसात प्रचंड चिड असून कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक विधीसाठी नदीकाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार करुन दगडाने डोक्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन अल्पवयीन मुलीला जबर जखमी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीला धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली. सदर आरोपीला अटक केली असून शासन त्यास शिक्षा देईलच, असे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले .

ही घटना दि.10 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीला गावातील बारक्या उर्फ अशोक मंगा भिल (रा.धूळपिंप्री, ता.पारोळा) याने बळजबरीने धरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याला विरोध केला असता मुलीच्या डोक्यावर दगड मारुन व दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत काही वेळानंतर जखमी अवस्थेत घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या परिवारातील सदस्यांना सांगितला असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पुढील तपास उपपोलीस निरीक्षक राजू

- Advertisment -

ताज्या बातम्या