Saturday, May 4, 2024
Homeनाशिकग्रीन फिल्ड संदर्भातील सुचना-हरकतींचा अहवाल पुढच्या महासभेत ठेवा

ग्रीन फिल्ड संदर्भातील सुचना-हरकतींचा अहवाल पुढच्या महासभेत ठेवा

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशन लिमीटेड कंपनीकडुन राबविण्यात येत असलेल्या ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत नगरपरियोजना अर्थात टी पी स्कीमसंदर्भात महासभेत झालेल्या ठरावानंतर याबाबत आलेल्या सुचना- हरकतींचा अहवाल पुढच्या महासभेत ठेवावा, असे आदेश प्रभारी महापौर भिकुबाई बागुल यांनी आज (दि. २०) महापालिका प्रशासनाला दिले.

- Advertisement -

महापौर सतिश कुलकर्णी यांना करोनाची लागण झाल्याने ते शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आजची ऑनलाईन महासभा त्यांच्याच अध्यंक्षतेखाली होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र अचानक आजची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेली महासभा प्रभारी महापौर तथा उपमहापौर श्रीमती बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यांच्यासोबत नगरसचिव व अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे आदी उपस्थित झाले होते.

सर्वच पदाधिकारी, गटनेते व नगरसेवक ऑनलाईन महासभेत सहभागी झाले होते. या बैठकीत गुरुमित बग्गा यांनी शहरातील नाशिक व मखमलाबाद शिवारातील नियोजीत ग्रीन फिल्ड प्रकल्प – टी पी स्कीम बाबत ठराव झाल्यानंतर यावर शेतकर्‍यांच्या सुचना हरकती मागविण्यात आल्या, त्याचे पुढे काय झाले ? याची माहिती महासभेला द्यावी अशी मागणी केली.

त्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी बग्गा यांच्या मागणीला समर्थन देत यासंदर्भातील खुलासा नगररचना विभागाचे सहा. संचालक अंकुश सोनकांबळे यांनी करावा अशी मागणी केली. यानुसार प्रभारी महापौरांनी सोनकांबळे यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले. मात्र बराच होऊन सोनकांबळे यांनी खुलासा केला नाही. यानंतर बडगुजर यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला.

तसेच विरोधकांनी यावर चर्चा व्हावी अशी मागणी लावून धरली. सोनकांबळे यांनी खुलासा केला नाही. महासभेतील या चर्चेनंतर शेवटी प्रभारी महापौरांनी ग्रीन फिल्डसंदर्भात महासभेत नगरसेवकांनी ज्या उपसुचना केल्या, शेतकर्‍यांनी विरोध केला यांची शहानिशा करुन शेतकर्‍यांचे समाधान करावेत, तसेच पुढच्या महासभेत ग्रीन फिल्ड ठरावानंतर शेतकर्‍यांच्या सुचना-हरकतींचा अहवाल पुढच्या महासभेत ठेवावा असे आदेश प्रशासनाला दिले. महासभेत प्रशासनाकडुन आलेले विकास कामांचे प्रस्ताव व सदस्यांचे विकास कामांच्या विषयांना प्रभारी महापौरांनी मंजुरी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या