- Advertisement -
येथील कोविड रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या २५ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या सर्व व्यक्ती अडावद (ता. चोपडा) येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.