Monday, November 25, 2024
HomeनाशिकNashik Loksabha Constituency 2024 : EVM च्या 'स्ट्राँग रुम' भोवती वाजेंचे स्वयंसेवक देणार...

Nashik Loksabha Constituency 2024 : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती वाजेंचे स्वयंसेवक देणार पहारा

नाशिक | Nashik

ईव्हीएम (EVM) ठेवलेल्या केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे स्वयंसेवक पहारा देणार असून, त्यांना सीसीटीव्ही कक्ष व नियंत्रण कक्षात बसण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी (Election Officers) परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र पोलिसांनाही दिले आहे.

- Advertisement -

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत (Loksabha Election) मतदान (Polling) झालेल्या ईव्हीएमशी छेडछाड होऊ नये यासाठी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी स्ट्राँग रुममध्ये जाणाऱ्या व्यक्तिंसोबत आमच्या प्रतिनिधीला नेण्याची विनंती केली होती. स्ट्राँग रुमच्या सुरक्षा कक्षाला लागून असलेले नियंत्रण कक्ष व सीसीटीव्ही कक्षाच्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांनी आपल्या प्रतिनिधींची मतमोजणीच्या दिवसापर्यंत नेमणूक करून त्यांना त्या वेळेत त्या कक्षात बसण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.

त्याअनुषंगाने वाजे यांनी दिलेल्या प्रतिनिधींना दि. २५ मे ते ४ जून या कालावधीत नमूद केलेल्या वेळेत व त्या कक्षाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या अनुषंगाने ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. केंद्रीय वखार महामंडळ, अंबड, नाशिक येथील सुरक्षा कक्षाच्या ठिकाणी नियुक्ती सुरक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सदर प्रतिनिधींचे ओळखपत्र तपासणी करुन सुरक्षा कक्षाला लागून असलेले नियंत्रण कक्ष व सीसीटीव्ही कक्षाच्या ठिकाणी प्रवेश देण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी लिखीत आदेश दिले आहेत.

वाजे यांनी दिलेल्या नियोजनानुसार दररोज सकाळी ७ ते दुपारी ३ वाजे दरम्यान सीसीटीव्ही कक्षात सुरज वाजे, विक्रम वाजे हे तर नियंत्रण कक्षात कैलास वाजे व आनंदा वाजे हे राहणार आहेत. दुपारी ३ ते रात्री ९ दरम्यान सीसीटीव्ही कक्षात अनिल पवार व चंद्रकांत वाजे हे तर नियंत्रण कक्षात पंढरीनाथ वारुंगसे, योगेश वामने व संकेत वाजे हे राहणार आहेत. रात्री ९ ते सकाळी ७ वाजे दरम्यान सीसीटीव्ही कक्षात (CCTV Room) ऋषिकेश वारुंगसे व विकास वारुंगसे हे राहणार आहेत. तर नियंत्रण कक्षात पंकज वाजे व विकास शिंदे हे राहणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या