Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रPHOTO : कोल्हापूरची महालक्ष्मी ते वणीची सप्तशृंगी देवी... प्रजासत्ताकदिनी ‘असा’ असणार महाराष्ट्राचा...

PHOTO : कोल्हापूरची महालक्ष्मी ते वणीची सप्तशृंगी देवी… प्रजासत्ताकदिनी ‘असा’ असणार महाराष्ट्राचा चित्ररथ

दिल्ली | Delhi

- Advertisement -

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (26 जानेवारी 2023)नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात (Maharashtra Chitrarath theme) ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ अशी थीम ठेवण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.

यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे तसेच त्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासियांना घरबसल्या होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या