सुरगाणा | प्रतिनिधी
तालुक्यातील उंबरठा वनपरिक्षेत्रातील काठीपाडा येथील शेतकरी सिताराम दहावाड यांच्या मालकीची विहीर गावालगतच्या शेतात आहे. रात्रीच्या अंधारात अंदाजे दीड ते दोन वर्षाचा बिबट्याभक्ष्याच्या शोधार्थ विहरीत पडला .
सकाळी काही महिला विहरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांच्या हि बाब लक्षात आली. ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला कळविले. सकाळी काही नागरिकांनी लोखंडी विणलेली खाट उलटी बांधून त्यावर बिबट्याला बसायची व्यवस्था केली होती.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर तसेच वनरक्षक तुकाराम चौधरी, अरुण मेघा, भटु बागुल, योगेश गांगुर्डे, याशिनाथ बहिरम, भास्कर चव्हाण, वामन पवार, कल्पना पवार, अविनाश छगणे, रामजी कुवर, हिरामण थविल, यमुना बागुल व नाशिक येथील वन्यप्राणी बचाव सहाय्यक पथक आदींनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बछडा असलेल्या बिबट्याला दुपारी बारा वाजेच्या सुमारास विहिरीतून सुरक्षित बाहेर काढून उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षित नेण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी नंतर त्यास वरिष्ठ वन अधिकारी यांच्या सल्ल्याने वन क्षेत्राच्या अधिवासात सोडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.