Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्याRaigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्याला सुरुवात; पाऊस, चिखल, धुक्याचं आव्हान

Raigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्याला सुरुवात; पाऊस, चिखल, धुक्याचं आव्हान

मुंबई । Mumbai

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. मध्यरात्रीनंतर तिथे बचावकार्य सुरू झालं. गुरुवारी दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही अद्याप घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याामुळे आज दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफनं सकाळीच बचावकार्याला सुरुवात केली आहे. आज दिवसभर बचावकार्य चालण्याची शक्यता स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

- Advertisement -

घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान या शोधकार्यत पावसाची मोठी अडचण येत आहे. मात्र एनडीआरएफच्या चार टीमकडून शोधकार्य सुरूच आहे. या टीमला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आजच्या शोधकार्यत अद्याप कोणताही मृतदेह हाती लागला नसून शोधकार्य सुरूच आहे. मोठ्या मशिन्सवर जात नसल्याने सुद्धा एनडीआरएफला बचावकार्य करताना अडथळे निर्माण होत आहेत, अशी माहिती दीपक तिवारी यांनी दिली.

आजही कुदळ, खोरं आणि फावड्याच्या सहाय्याने मदत कार्य करण्यात येत आहे. प्रचंड मोठा ढिगारा उपसण्याचं आव्हान जवानांसमोर आहे. पाऊस पडत असल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे हा ढिगारा उपसण्यात अडचणी येत आहेत. जवानांसोबत स्थानिक नागरिकही मदतीला धावून आले आहेत. दरम्यान, आतापर्यंतच्या शोधमोहिमेत एकही मृतदेह हाती लागलेला नाहीये. दरम्यान, काल सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री शिंदे इर्शाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते. त्यानंतर दीड तास पायपीट करत इर्शाळवाडीत दु्र्घटनाग्रस्त गावाला भेट दिली. मुख्यमंत्री स्वतः बचावकार्यात सहभागी झाले. याच काळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे तेथील कामकाजाची जबाबदारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या