Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपानं भाकरी फिरवली! राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नव्या टीमची घोषणा.. कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी?

भाजपानं भाकरी फिरवली! राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नव्या टीमची घोषणा.. कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी?

मुंबई | Mumbai

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या (lok sabha vidhana sabha elections) धरतीवर आत्तापासून अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने मोठे खांदेपालट केली आहे. भाजपाने जिल्हा पातळीवर भाकरी फिरवली आहे. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाकडून जिल्हाध्यक्षपदी तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७० पक्षासाठी नावांची घोषणा केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने २०२४ च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे. असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान अहमदनगर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते ॲड.अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग तर उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Video : नगरमधील ‘मर्डर’ विधीमंडळात गाजला

कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी?

- Advertisment -

ताज्या बातम्या