ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) तीन दिवसापासून पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावल्याने बऱ्याच ठिकाणी करपू लागलेल्या पिकांना (Crop) जीवदान मिळाल्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यात या पावसामुळे प्रथमच नदी नाले खळखळून प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच तालुक्याचा पश्चिम भाग वगळता इतरत्र फक्त रिमझिम पाऊस झाला होता. त्यामुळे विहिरींनी कधीच तळ गाठला होता, मात्र सध्या पडणाऱ्या पावसामुळे विहिरींना पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे….
Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच; धरणे ‘इतकी’ टक्के भरली
दिंडोरीच्या पश्चिम भागातील ननाशी, कोशिंबे मंडळामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे वाघाड धरण (Waghad Dam) १०० टक्के भरले असून सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे परिसरातील वाघाड धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणा-या शेतकरी (Farmer) वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. तर करंजवण धरणाच्या पाणलोट क्षेत्रातच्या पश्चिम परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसात असल्यामुळे करंजवण धरणातील (Karanjavan Dam) पाणीसाठा ६८ टक्क्यांवरून ८५ टक्के इतका झाला असून पावसाचा जोर दोन दिवस असाच राहिल्यास करंजवण धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे हे सर्व पाणी पुणेगाव धरणात (Punegaon Dam) येत असल्याने पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून उनंदा नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे ओझरखेड धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन ओझरखेड धरणाचा (Ozarkhed Dam) पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. याशिवाय कादवा, कोलवण नदीसह छोट्या मोठ्या नाल्याचे पाणी पालखेड धरणात (Palkhed Dam) जमा होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पालखेड धरणातून कादवा नदी पात्रात ६००० हजार क्युसेस पाण्याचा विसंर्ग सोडण्यात आला होता. मात्र, रात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे सध्या या धरणातून ४१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग कादवा नदीत चालू आहे.
आंध्र प्रदेशात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा! माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; नेमकं प्रकरण काय?
तर तिकडे आतापर्यंत कोरडे असलेल्या तिसगाव धरणामध्ये (Tisgaon Dam) हळूहळू पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा ३० टक्के इतका झाल्यामुळे पाणी योजनेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर दोन दिवस असाच राहिल्यास तालुक्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यासह चांदवड, येवला, मनमाड, निफाड तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उतसाहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Rain Alert : ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, IMDचा अंदाज
दिंडोरी तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा
करंजवण ८५ टक्के
पालखेड ८२ टक्के
पुणेगाव ९४ टक्के
वाघाड १०० टक्के
ओझरखेड ७४ टक्के
तिसगाव ३० टक्के
दिंनाक. ०९ / ०९ / २०२३ रोजीचा पाऊस
दिंडोरी ८०.०० मिमी
रामशेज ७३.६ मिमी
ननाशी १२१.०० मिमी
उमराळे ८७.०० मिमी
लखमापूर ७५.०० मिमी
कोशिंबे ११५.०० मिमी
मोहाडी ६१.०० मिमी
वरखेडा ८८.०० मिमी
क वणी ८३ .०० मिमी
किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून लवकरच होणार चौकशी?