Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यापाणी आरक्षणचा प्रश्न निकाली

पाणी आरक्षणचा प्रश्न निकाली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) आणि पाटबंधारे विभाग (Irrigation Department) यांच्यात पाणी आरक्षण (Water Reservation) करारनामा (Agreement) पूर्ण झाला असून

- Advertisement -

या करारानुसार 2041 पर्यंत मनपाला वाढीव पाणी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. या करारामुळे मनपाची विनाकारण दुप्पट आकाराची बिले (bills) आता दिसणार नाही. मागील अकरा वर्षांपासूनचा हा गंभीर प्रश्न मार्गी निघाला आहे.

आज मनपात पाटबंधारे विभागाची (Irrigation Department) बैठक झाली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी या प्रश्नाबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीतही हा विषय मांडण्यात आला होता. अखेर या प्रश्नावर तोडगा निघून करार झाला.

जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे व पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मनपा आयुक्तांनी त्यांचे आभार मानले. करार करुन दंडनीय दराने 2011 पासून करण्यात आलेली पाणी पट्टी (water tax) व विलंब आकार रद्द करणे आणि 2011 पासुन जलसंपदा विभागाने नाशिक मनपास मान्य नसलेल्या थकबाकी पोटी परस्पर वळती करुन घेतलेली महापालिकेस देय असलेली स्थानिक उपकराची रक्कम नाशिक मनपास अदा करणे अशी प्रमुख मागणी मनपाची होती.

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियाना (Jawaharlal Nehru National Urban Reconstruction Campaign) अंतर्गत नाशिक शहरासाठी (nashik city) 2041 पर्यन्त पिण्याचे पाण्यासाठी 399.63 दलघमी पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. या वाढीव पाणी आरक्षण (Water reservation) करीता नाशिक महानगरपालिकेने पाटबंधारे विभागासोबत करारनामा करणे आवश्यक होते. त्याकरिता नाशिक मनपाने सिंचन पुनर्स्थापना खर्च अदा न केल्याचे कारण दर्शवत जलसंपदा विभागाने करारनामा प्रलंबित ठेवलेला होता.

तसेच जलसंपदा विभागाने सन 2018 अखेर 135.68 कोटी सिंचन पुनर्स्थापना खर्चाची रक्कम मनपाने अदा करावी, रक्कम अदा केल्याशिवाय करारनामा पुर्ण होणार नाही असे सांगितले होते. पाणी आरक्षण करारनामा करून घेण्यातबाबत आयुक्त यांनी 11 नोव्हेंबर रोजी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व मनपा अधिकारी यांचे समवेत बैठक घेतली होती.

तर आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता रविंद्र धारणकर आणि पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अरुण निकम उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या