Friday, April 25, 2025
Homeजळगावतरुणांची साथ अन् थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच-गुलाबराव पाटील

तरुणांची साथ अन् थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच-गुलाबराव पाटील

जळगाव । प्रतिनिधी

शिरसोली, रामदेववाडी येथे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादाने भारावलो असून तरुणांची साथ आणि थोरामोठ्याच्या आशीर्वादाने भगवा फडकेल असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला, ते शिरसोली येथे पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीत भगवे तुफान संचारले होते. शिरसोली प्रबो, शिरसोली या दोन गावांना जोडणारा पूल, नवे प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा योजना, विज उपकेंद्र, शेतकर्‍यांसाठी ट्रांसफार्मर, विविध सामाजिक सभागृह, ग्राम सचिवालय इमारत, तलाठी कार्यालय व गावअंतर्गत मूलभूत सुविधा, शिरसोली ते धानवड व परिसरातील गावांना जोडणारे रस्ते मंजूर करून गाव जोडण्याचे व शेतकरीहिताचे काम केल्याने या निवडणुकीत धनुष्यबाणाचे तुफान कोणीही रोखू शकणार नाही असा सूर व्यक्त होत आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, रवी कापडणे, जि. प. सदस्य पवन सोनवणे, सुर्यवंशी बारी मित्र मंडळ, सहकार्य मित्र मंडळ, वीरता मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामराज्य मित्र मंडळ, समता मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळ, शिवराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह महा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरसोलीतील सोनार समाजाचा पाठिंबा
शिरसोली येथे गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी शिरसोली येथील श्री संत नरहरी सोनार संस्थेच्या पदाधिकारी व सोनार समाजाच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी शिरसोली येथील संत नरहरी सोनार महाराज संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, सचिव अतुल भालेराव, सदस्य कैलास अहिरराव, संजय सोनार, दिपक सोनार, बंडू सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...