Friday, November 15, 2024
Homeजळगावना जाहीरनामा, ना व्हिजन; चाललेत आमदार व्हायला-विनोद लांबोळे

ना जाहीरनामा, ना व्हिजन; चाललेत आमदार व्हायला-विनोद लांबोळे

अमळनेर । प्रतिनिधी

माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत कोणताही जाहीरनामा ना कुठलेही व्हिजन दिसत नसून केवळ आमदार व्हायचे एवढाच अट्टहास आहे, त्यांच्या प्रचारात कुठेही सुज्ञ व जेष्ठ नागरिक दिसत नसून याउलट विकास पुरुष असलेल्या अनिल पाटलां सोबत जेष्ठ श्रेष्ठ मंडळी भक्कमपणे उभी असल्याचा दावा माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी केला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की शिस्तबद्ध आणि अभ्यासू व्यक्तीमत्व कस असावं हे आपण मंत्री अनिल पाटील यांच्या रूपाने अनुभवत असून युवा दशेत असताना चळवळीतुन उदयास आलेलं हे व्यक्तिमत्व आहे. सहकार क्षेत्र असेल किंवा विविध संस्था असेल यावर काम करून पुरेसा अनुभव घेऊन घडलेलं हे व्यक्तिमत्व आहे. 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कुठलाही डाग नाही, कुणाची फसवणूक नसुन, सुसंस्कृतपणा नेहमीच त्यांच्यात दिसुन आला आहे.

आमदार झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात शाश्वत असा विकास करून विकासाचे व्हिजन देखील त्यांनी दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे विरोधी उमेदवार असलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदारकी जाऊन पाच वर्ष उलटली तरी देखील त्यांनी गाडीवरचे सिम्बॉल काढलेले नाही, तसेच पाच वर्षांपासून घरावरील आमदार कार्यालय हे नाव आजही जशेच्या तसेच आहे. याला बालहट्ट म्हणावा का? यांनी मागील जाहीरनाम्यात सूतगिरणी उभारण्यात येईल असे लिहिले होते मात्र जागा घेऊन सूतगिरणीचे अनुदानही लाटले असल्याचे समजले आहे.

भारतीय जनता पार्टीचे आपण सद्स्य आहेत असे दर्शवून जनतेची दिशाभूल करीत असताना पक्षाने त्यांना निकासीत केले आहे. तरी देखील ते पत्र खोट असल्याचे सांगून पक्षाच्या निर्णयाला देखील ते खोटं ठरवीत आहेत. जनतेनेही त्यांना ओळखले असून आता कितीही जातीवाद केला आणि कितीही भूलथापा मारल्या तरी संपूर्ण जनता भूमिपुत्र अनिल दादा यांच्याच पाठीशी राहील असा दावा त्यानी केला आहे.


महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मातीतला भूमिपुत्र म्हणुन पाठबळ देण्यासाठी मतदार संघातून अनेक जण संघटितपणे पुढे येत आहेत. गेल्या पाच वर्षात मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांमुळे ज्या-ज्या ठिकाणी ते प्रचारासाठी जात आहेत त्या-त्या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होत असून येणार्‍या पंचवार्षीकसाठीही तेच आमदार आणि मंत्री असतील असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या