चाळीसगाव । प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावाचीच चर्चा होतांना दिसत आहेत. महिला, पुरुष, तरुण अबालवृद्ध सगळ्यांच्या तोंडी फक्त मंगेश चव्हाण हेच नाव ऐकायला मिळत आहे.
तालुक्यातील कोणत्याही गावात गेलं तरी प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे महायुती सरकारच्या योजना असोत किंवा आमदार मंगेश चव्हाण यांच्या सामाजिक दायित्वातुन शिष्यवृत्ती योजना, सायकल वाटप, दप्तर वाटप, भाऊबीज, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना असेल तसेच तरुणांना रायगड वारी, ज्येष्ठांसाठी पंढरपूर वारी असो अशा अनेक माध्यमांतून आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून दिला आहे. अंतिम टप्प्यात आमदार मंगेश चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल होतांना दिसत असून सर्वदूर कमळचीच चर्चा जोर धरताना दिसत आहे. गावांमध्ये, शहरात ठिकठिकाणी गृप चर्चांमध्ये तालुक्यातील होत असलेल्या विकासकामांबाबत विषय कानावर पडत असून आश्वासन न देता प्रत्यक्ष करोडो रुपयांची विकासकामे करुन दाखवली असून आमदार मंगेश चव्हाण यांना पुन्हा निवडून दिले तर नक्कीच यापेक्षा अजून कित्येक पटीने विकासकामे होतील आणि गेल्या 50 वर्षातील सर्व क्षेत्रांतील बॅकलॉग भरून आपला तालुका एका वेगळ्या उंचीवर जाईल त्यामुळे मंगेश चव्हाण यांना पुन्हा संधी दिली पाहिजे असं देखील लहान मोठ्या सगळ्यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.
याउलट उबाठाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये जे आश्वासन दिले होते त्यापैकी एकही ते पुर्ण करु शकले नसल्याने त्यांच्यावर मतदारांचा रोष असल्याचे देखील बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी कोणतेही आश्वासन न देता फक्त विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली होती आणि गेल्या 5 वर्षांत मंगेश चव्हाण यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत शाश्वत विकास केला असून त्याला सामाजिक दायित्वाची देखील जोड देऊन मतदारसंघातील जनतेचा विश्वास जिंकला आहे.