Saturday, May 4, 2024
Homeनगरसंस्कृतीनुसार पोषाख; साडेपंधरा हजार साईभक्तांच्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया

संस्कृतीनुसार पोषाख; साडेपंधरा हजार साईभक्तांच्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेल्या सभ्यतापूर्ण पोषाख अथवा भारतीय संस्कृतीस

- Advertisement -

अनुसरून पोषाख परिधान करून मंदिरात दर्शनाकरिता यावे, अशी आवाहन वजा विनंती फलकांबाबत दिनांक 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत 15 हजार 506 साईभक्तांनी आपल्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया नोंदविलेल्या असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

कान्हूराज बगाटे म्हणाले, श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सभ्य पोषाखात नसतात अशा तक्रारी काही भक्तांनी संस्थान प्रशासनाकडे केलेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संस्थान प्रशासनाकडून सभ्यतापूर्ण पोषाख परिधान करून मंदिरात दर्शनाकरिता यावे, अशी आवाहन वजा विनंती करण्यात आलेली होती.

तसे फलकही मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले आहेत. या फलकांच्या माध्यमातून संस्थानने भाविकांना कुठलीही सक्ती केली नसून हे फक्त आवाहन करण्यात आलेले आहे. तरी या फलकाबाबत साईभक्तांचे मत जाणून घेण्याकरिता संस्थानच्यावतीने दर्शन रांगेत अभिप्राय नोंदवही व फॉर्मची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्यानुसार 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत श्रींच्या दर्शनाकरिता आलेल्या सुमारे 15 हजार 599 साईभक्तांनी मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेल्या फलकांबाबत आपला अभिप्राय नोंदविलेला आहे. यामध्ये 15 हजार 506 साईभक्तांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नसून सदरचा निर्णय योग्यच आहे, असा अभिप्राय नोंदविलेला आहे. तर 93 साईभक्तांनी हा निर्णय अयोग्य असल्याबाबत अभिप्राय नोंदविला असल्याचे कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या