Saturday, July 27, 2024
Homeजळगावपोलीस पाटील व कोतवाल पदाचा निकाल आजच होणार जाहीर

पोलीस पाटील व कोतवाल पदाचा निकाल आजच होणार जाहीर

जळगाव – jalgaon

जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदांसाठीची परीक्षा आज शहरातील ८ केंद्रावर सुरळीत पार पडली. पोलीस पाटील २२८० व कोतवाल पदांसाठी ११३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. या पदांचा आजच, दि. १३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद देखरेखीखाली घेण्यात आलेल्या या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. पोलीस पाटील या पदाकरीता सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ८ केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली व कोतवाल पदाकरीता दुपारी ३ ते ४ या वेळेत ४ केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली.

भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ तहसीलदार (कार्यकारी दंडाधिकारी) व ७ उपविभागीय अधिकारी (उपविभागीय दंडाधिकारी) यांना गोपनीय स्थळी पाठवून त्यांना भरती प्रकिया पारदर्शकता राबविण्याकामी सूचना दिल्या. तसेच त्यांच्याकडून मोबाईल व इंटरनेट विरहीत काम करुन घेवून त्याठिकाणी २४ तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. गोपनीय स्थळी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना देखील प्रवेश करण्यास मनाई होती. दोन्ही पदांच्या परिक्षेची उत्तरपत्रिका स्कॅनिंग करुन १३ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर लेखी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सदर भरती प्रकियेत पारदर्शकता ठेवण्यात आली असून परीक्षा दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडलेला नाही. परिक्षेत आलेल्या प्रश्नाबाबत विहीत मुदतीत कोणत्याही आक्षेप प्राप्त झालेला नाही.

पोलीस पाटील या पदाकरीता एकूण २४६७ उमेदवारापैकी २२८० उमेदवार परिक्षेसाठी हजर व १८७ उमेदवार गैरहजर होते. व कोतवाल या पदाकरीता एकूण १२७८ उमेदवारापैकी ११३५ उमेदवार परिक्षेसाठी हजर व १४३ उमेदवार गैहजर होते.

पोलीस पाटील या पदाच्या मुलाखतीसाठी समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी यांना स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात येणार आहे. परीक्षा पारदर्शकपणे पार पाडल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या