Friday, June 28, 2024
HomeनाशिकNashik Fraud News : मनी लाँन्ड्रिंगच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तिस लाखोंचा गंडा

Nashik Fraud News : मनी लाँन्ड्रिंगच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तिस लाखोंचा गंडा

आयुष्याची जमापुंजी गमविली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

तुमच्या मोबाईलवरुन (Mobil) मनी लाँन्ड्रिंगचे व्यवहार (Money laundering Transactions) झाले आहेत. तसे ठोस पुरावे मुंबई क्राईम ब्रँन्चच्या (Mumbai Crime Branch) हाती लागले असून, यातून सुटका करुन घ्यायची असेल तर, आम्ही सांगू त्या बँक खात्यांत पैसे भरा, असे सांगून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पोलिसांच्या नावे सेवानिवृत्त व्यक्तिस ५० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या स्वरुपाची नाशकात ही तिसरी फसवणूक असून आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पोलिस निरीक्षक झाले ‘एसीपी’; गृहविभागाकडून १३९ अधिकाऱ्यांना बढती

याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीतून सेवानिवृत्त झालेले ५९ वर्षीय व्यक्ति शहरात वास्तव्यास आहेत. सदर व्यक्ती २ ते १६ जून या कालावधीत घरी असतांना अचानक त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी संशयितांनी 8592769683 व 8222856817 वरुन फोन करुन ‘मुंबई क्राईम ब्रान्चमधून विजय खन्ना आणि राहुल गुप्ता बोलत आहोत, तुमचा मोबाईल नंबर मनी लाँन्ड्रिंगमध्ये वापरण्यात आला आहेत, तसे संशयास्पद पुरावे आमच्या हाती लागले असून आम्ही कठोर कारवाई करु, अशी धमकी दिली.

हे देखील वाचा : Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

त्यामुळे सेवानिवृत्त व्यक्ति घाबरुन गेला. त्याला भिती वाटल्याचे कळताच संशयित सायबर चोरट्यांनी (तोतया पोलीस) गैरफायदा घेत तुम्हाला यातून सुटका करुन घ्यायची असेल तर, ‘आम्ही सांगू त्यानुसार कार्यपद्धती अवंलबवा, तुम्हाला आम्ही बाहेर काढू’ असे म्हणून दिलासाही दिला. यानंतर सायबर चोरट्यांनी या व्यक्तिस बँक खात्यांमध्ये जमा असलेले पैसे आम्ही सांगू त्या खात्यांमध्ये वर्ग करा असे सांगितले. कारवाईच्या भितीने या व्यक्तिने ४९ लाख ८९ हजार रुपये विविध बँक खाते, वालेटवर पाठविले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘आयटीआय’ मध्ये १९ लाखांचा घोटाळा

स्कायपी आयडीचा वापर

तक्रारदार व्यक्ति महिंन्द्रा कंपनीतून सेवानिवृत्त झाल्याने त्याला लाखो रुपयांचा फंड मिळाला होता. त्यातून ते आयुष्याचे पुढील नियोजन करणार होते. मात्र, आता आयुष्याची जमापुंजीच बुडाल्याने ते विवंचनेत सापडले आहेत. तर, तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशिल अधीच जाणून घेतला होता. सोबतच, फोन करुन मनी लाँन्ड्रडिंगचे आरोप केल्यावर काही बनावट कागदपत्रे, तयार केलेले पुरावे या सेवानिवृत्तास पाठविले. यानंतर live:.cid.4d2f664b या स्कायपी आयडीवरुन (Skype ID) व्हिडीओ कॉल, मेसेज करुन थमकी दिली. तसेच, नंतर तुम्हाला या गुन्ह्यातून बाहेर काढू असे म्हणून दिलासा देत पैसे उकळले.

हे देखील वाचा : Nashik Suicide News : एकाच दिवशी दोन मुलींची आत्महत्या; कारणे अस्पष्ट

कोणतीही पोलीस यंत्रणा, अकार्यकारी शाखा नागरिकांना अशा पद्धतीने फोन करुन पैशांची मागणी करत नाहीत. कुणालाही अशा स्वरुपाचे फोन कॉल, धमकी, मेसेज आल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. या प्रकरणात आम्ही तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरु केला आहे. – रियाज शेख, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या