Tuesday, June 16, 2026
Homeनगरदहेगावात निवृत्त पोलीस निरीक्षकाची गुंडागिरी; वृद्ध शेतकऱ्याला मुलासमक्ष बेदम मारहाण

दहेगावात निवृत्त पोलीस निरीक्षकाची गुंडागिरी; वृद्ध शेतकऱ्याला मुलासमक्ष बेदम मारहाण

राहाता (प्रतिनिधी)

ज्या हातांनी कायद्याचे रक्षण करायचे त्याच हातांनी एका निवृत्त पोलीस निरीक्षकाने माणुसकीला काळिमा फासल्याचा संतापजनक प्रकार राहाता तालुक्यातील दहेगाव कोऱ्हाळे येथे घडला आहे. किरकोळ शेणखताच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलाला भर रस्त्यात बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दहेगाव येथील रहिवासी भाऊसाहेब चांगदेव डांगे यांच्या हक्काच्या जागेतील शेणखत काढून घेण्याच्या कारणावरून हा वाद उफाळला. निवृत्त पीआय मेघशाम डांगे यांनी दादागिरी करत खत काढण्यासाठी तगादा लावला. भाऊसाहेब यांनी दोन दिवसात जागा मोकळी करतो असे शांतपणे सांगितले असतानाही मेघशाम डांगे यांनी या वृद्ध शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत भाऊसाहेब डांगे यांच्या छातीला आणि कानाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा मुलगा संकेत डांगे यालाही आरोपींनी सोडले नाही. तुला आणि तुझ्या बापाला संपवून टाकू, अशा भाषेत या माजी पोलीस अधिकाऱ्याने धमकावल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. याबाबत भाऊसाहेब डांगे यांनी राहाता पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ताज्या बातम्या

राज्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम...