तेलंगणा | Telangana
गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाल्याने लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर जोरदार टीका केली होती तर आता तेलंगणा सरकारने (Telangana Government) मोठा निर्णय घेतला आहे.
तेलंगणातील एका महत्वाकांक्षी उपक्रमासाठी अदानी ग्रुपकडून पैसे घेणे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी नाकारले आहे. काँग्रेसच्या अदानीविरोधी पावित्र्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, Young India Skill University या उपक्रमासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी समोर येत सढळ हातांनी निधी दिला आहे, यातच अदानी समुहाकडून देखील १०० कोटीचा निधी देण्यात आला. मात्र अदानी समुहाने दिलेले १०० कोटी रुपये परतवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील वादामुळे अदानी समूह चांगलाच वादात सापडला आहे. भारतात देखील यावरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेअर बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. हे लाच प्रकरणावर वाद निर्माण झाल्यावर अदानी समूहाने स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. तर या प्रकारामुळे कंपनीने अमेरकेतील एक गुंतवणुकीचा मोठा करार देखील रद्द केला आहे.