Thursday, November 21, 2024
Homeनगरमहसूल व पोलीस यंत्रणेतील कर्मचार्‍यांचे करोना लसीकरण

महसूल व पोलीस यंत्रणेतील कर्मचार्‍यांचे करोना लसीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्वनियोजनाप्रमाणे संपत नसल्याचे लक्षात येताच जाग आलेल्या आरोग्य यंत्रणेने आता

- Advertisement -

करोना लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी घाई सुरू केली आहे. यासाठी आज (बुधवारी) एकाच वेळी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 48 प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 हजार 800 आणि नियमित 27 केंद्रांवर प्रत्येकी 100 प्रमाणे 2 हजार 700 जणांचे करोना लसीकरण होणार आहे. आज एका दिवसात 6 हजार 500 डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांसह पोलीस व महसूल कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

यापूर्वी केवळ जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, खाजगी रुग्णालये व महापालिका आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जात होते. बुधवारी मात्र जिल्ह्यातील 48 आरोग्य केंद्रांवर प्रथमच करोना लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये महसूल व पोलिस यंत्रणेला लस दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.

या पीएसींवर होणार लसीकरण

जिल्ह्यातील 48 केंद्रावर आज लसीकरण होणार असून यात संगमनेर तालुक्यातील 3, नगर तालुक्यातील 4, अकोले तालुक्यातील 5, जामखेड तालुक्यातील 1, कोपरगाव तालुक्यातील 3, कर्जत तालुक्यातील 3, नेवासा तालुक्यातील 3, पारनेर तालुक्यातील 4, पाथर्डी तालुक्यातील 3, शेवगाव तालुक्यातील 2, राहुरी तालुक्यातील 3, राहाता तालुक्यातील 8, श्रीगोंदा तालुक्यातील 4 व श्रीरामपूर तालुक्यातील 3 केंद्रांवर प्रत्येकी शंभर जणांना करोनाचा डोस दिला जाणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या