Tuesday, July 23, 2024
Homeनगर128 महसूल मंडळ चारा डेपोसाठी पात्र

128 महसूल मंडळ चारा डेपोसाठी पात्र

पाऊस लांबल्यास प्रशासनासमोर पर्याय तयार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सरकारने नुकताच राज्यात गरज असणार्‍या ठिकाणी, तसेच कमी पर्जन्यमान असणार्‍या महसूल मंडळांत चारा डेपो सुरू करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयानूसार नगर जिल्ह्यात गरज भासल्यास 128 महसूल मंडळांत चारा डेपो सुरू होवू शकतात. याबाबतचे पर्याय प्रशासनासमोर खुले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या 128 मंडळात 93 मंडळ हे 10 नोव्हेंबर 2023 आणि 35 मंडळे ही 16 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार चारा डेपो सुरू करण्यास पात्र आहेत.
सरकारने मागील वर्षी कमी पर्जन्यमान असणार्‍या राज्यातील 40 तालुक्यात 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयानूसार दुष्काळ घोषित केला होता.

त्यानंतर उर्वरित राज्यातील 1021 मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेली होती. याठिकाणी दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या होत्या. यात नगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच मंडळांचा समावेश होता. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव वगळता अन्य मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली होती. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2024 ला पुन्हा शासन निर्णय काढत जिल्ह्यातील 35 महसूल मंडळांत दुष्काळी सवलतील लागू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता पावसाळा सुरू झाला असून जिल्ह्यात दक्षिणेचा भाग वळता उत्तरेत पावसाचे प्रमाण कमी आहे.

तसेच पाऊस झाल्यानंतर देखील नवीन चारा निर्माण होण्यास सुमारे महिनाभराहून अधिक कालावधी आवश्यक असल्याने कमी पर्जन्यमान असणार्‍या भागात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यात चारा डेपो सुरू करण्यासाठी पात्र असणार्‍या मंडळाची प्राथमिक माहिती तयार करण्यात आलेली आहे. यात जिल्ह्यात नवीन आणि जुने अशा 128 महसूल मंडळात चारा डेपो सुरू करता येऊ शकणार आहेत.

फेब्रुवारी 2024 निर्णयानूसार जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील साकत आणि पाटोदा, शेवगाव-मुंगी, दहिगाव-ने. श्रीगोंदा-भानगाव, आढळगाव, लोणी व्यंकनाथ. पारनेर- कान्हूर पठार, पळवे खु. जवळा, आळकुटी. नेवासा- भानसहिवरे, प्रवरा संगम, देडगाव.राहाता-अस्तगाव. श्रीरामपूर- कारेगाव. कोपरगाव-कोकमठाण. अकोले-खिरवरे, लिंगदेव, वाकी, रुंभोडी. पाथर्डी-अकोला, खरवंडी, तिसगाव. राहुरी-बारागाव नांदूर. नगर- नेप्ती. कर्जत- कोरेगाव, खेड, कुळधरण, वालवड. संगमनेर- नांदूरखंदमाळ, संगमनरे खु. निमोण आणि घुलेवाडी यांचा समावेश आहे. तर नोव्हेंबर 2023 शासन निर्णयात पाथर्डीतील कोरडगाव वगळता सर्व महसूल मंडळ चारा डेपोसाठी पात्र आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या