Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रट्विटरची आणखी एक कारवाई! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट लॉक

ट्विटरची आणखी एक कारवाई! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट लॉक

दिल्ली | Delhi

काँग्रेस (Congress) आणि ट्विटर (Twitter) यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं ट्विटर (Twitter Account) अकाऊंट तात्पुरत निलंबित (suspended) केलं गेलं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातल्या काही बड्या वरिष्ठ नेत्यांचेही अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांचे अकाऊंट ट्विटरकडून लॉक करण्यात आले आहे. याबाबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे आता ट्विटरची (Twitter India) काँग्रेस नेत्यांवर कारवाई सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, याआधी बुधवारी रात्री काँग्रेसने (Congress) दावा केलाय की, रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्या सह पाच वरिष्ठ नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटविरोधात (Twitter Account) कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच गुरुवारी काँग्रेस पक्षाचे (Congress Party) अधिकृत ट्विटर अकाऊंट (Official Twitter Account Block) निलंबित करण्यात आले आहे. मायक्रोब्लॉगिंग साईटच्या निमयांचे (Microblogging site Rules) उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटर कंपनीने सांगितलं आहे. काँग्रेसने फेसबुकवर पोस्ट (Congress Facebook post) करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

काँग्रेसने (Congress India) दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे (AICC) महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन (ajay maken), लोकसभा पार्टीचे व्हिप मनिकम टेगौर (Manickam Tagore), आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव (Sushmita Dev) यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी गेल्या आठवड्यात एका नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाची छायाचित्रे ट्विट केली होती, जिची कथितपणे बलात्कार आणि हत्या (Rape and Murder) झाली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) राहुल गांधी यांच्या ट्विटची दखल घेतली आणि अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस नेत्याच्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या