नाशिक | प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी (दि.२४) नाशिक जिल्हा दौर्यावर येत असून, येथील विभागीय आयुक्तालय नाशिक येथे दुपारी २.३० वाजता नागरिकांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद साधणार आहेत.
शनिवारी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्तालयाचा आढावा, दुपारी १२ वाजता नोंदणी महानिरीक्षक यांच्या विभागाचा आढावा आणि दुपारी १ वाजता महसूलमंत्री महोदय हे जमाबंदी आयुक्त यांच्या कार्यालयाचा आढावा घेणार आहेत.
नागरिकांनी आपली निवेदने शनिवारपर्यंत देता येतील. निवेदने स्वीकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.