Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी नाशिक दौर्‍यावर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी नाशिक दौर्‍यावर

महसूल यंत्रणेचाही घेणार आढावा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी (दि.२४) नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत असून, येथील विभागीय आयुक्तालय नाशिक येथे दुपारी २.३० वाजता नागरिकांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद साधणार आहेत.

- Advertisement -

शनिवारी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्तालयाचा आढावा, दुपारी १२ वाजता नोंदणी महानिरीक्षक यांच्या विभागाचा आढावा आणि दुपारी १ वाजता महसूलमंत्री महोदय हे जमाबंदी आयुक्त यांच्या कार्यालयाचा आढावा घेणार आहेत.

नागरिकांनी आपली निवेदने शनिवारपर्यंत देता येतील. निवेदने स्वीकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....