Sunday, May 18, 2025
Homeनगरजनतेच्या पाठबळावर पुन्हा एकदा विजय मिळवू

जनतेच्या पाठबळावर पुन्हा एकदा विजय मिळवू

ना.विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राहाता |प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास आणि मतदार संघातील जनतेच्या पाठबळावर पुन्हा एकदा विजय मिळवून या भागाच्या विकासाकरिता आपण कटिबध्द राहू, असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

लोणी बुद्रुक येथे मंत्री विखे पाटील यांनी ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. सर्वांच्या शुभेच्छा स्विकारुन त्यांनी राहाता तहसील कार्यालयात कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता साध्या पध्दतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल जैन, शिर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी आणि गुजरात विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते आदी पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे समर्थक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, या मतदार संघातून सलग सात वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रती आभार व्यक्त करुन या भागाच्या विकासाकरिता आपण सातत्याने प्रयत्न केले. या भागातील विकास कामांमुळेच जनतेचे पाठबळ सातत्याने मिळाले. या निवडणुकीतही हा विश्वास सार्थ ठरवू, असेही त्यांनी सांगितले. सरकारच्या माध्यमातून या भागातील विकास प्रक्रीयेला गती मिळाली. उर्वरित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपले प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...