Wednesday, April 30, 2025
Homeनगरमहसूल मंत्री विखे यांची राहुल गांधींवर टीका म्हणाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून...

महसूल मंत्री विखे यांची राहुल गांधींवर टीका म्हणाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून…

महसूल मंत्री विखे यांची राहुल गांधींवर टीका

अहिल्यानगर |प्रतिनिधी Ahilyanagar

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सकाळी काय बोलता आणि संध्याकाळी काय बोलता याचे त्यांनाच भान नाही. देशात काय बोलावे आणि देशाबाहेर काय बोलावे हे गांधी यांना उमजत नाही. वॉशिंग्टनला जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करणारे आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण मर्यादा ओलांडण्याची भाषा करत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता आता दुधखुळी राहिली नसल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

नगरमध्ये माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यातील काँग्रेस पक्षाचा एकही नेता अथवा पुढारी मराठा आरक्षणाचे समर्थन करत नाही. महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे म्हणतात, केंद्र सरकारने आरक्षण जाहीर करावे, ज्येष्ठ नेते शरद पवार यापूर्वी म्हणाले होते की, आरक्षण देता येत नाही, यावरून आरक्षणाबाबत महाविकास आघाडीची भूमिका लपून राहिलेली नाही. विशेष करून काँग्रेसला आरक्षणाचा मुद्दा समजलेला नाही. अशी एकत्र आघाडी करून ते महाराष्ट्राचा विकास करणार की महाराष्ट्र भकास करणार हे जनतेने ठरवण्याची वेळ आली आहे. राज्यातील जनता याबाबत निर्णय घेईल, असा विश्वास आहे.

शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले, नौदलाने हा पुतळा उभा केला होता. पुतळ्याबाबत जे घडले त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितलेली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे राज्य असणार्‍या कर्नाटक, पंजाबमध्ये महाराजांचा पुतळा का उभारला नाही. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे दैवत आहे. राज्यात 15 वर्षे काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी शिवाजी महाराजांविषयी आता भावना व्यक्त करण्याऐवजी त्यावेळी पुतळा का उभरला नाही, असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित केला. महाराजांच्या नावाने राजकारण करण्यात येत असून असे भावनिक राजकारण चालणार नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

देवेन

Deven Bharati: आयपीएस देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त; विवेक फणसळकर...

0
मुंबई | Mumbai विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू...