Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यास्वच्छ सर्वेक्षणासाठी संघटनांची आढावा बैठक

स्वच्छ सर्वेक्षणासाठी संघटनांची आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या(swachh sarvekshan 2023 ) अनुषंगाने नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील संघटनांची बैठक मनपा ( NMC)मुख्यालय राजीव गांधी भवन येथे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, शहर अभियंता नितीन वंजारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

- Advertisement -

या बैठकीत सिंगल युज प्लास्टिक बंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छ सर्वेक्षण 2023 सीएसआर निधीअंतर्गत शहरात करावयाची कामे आदि बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपस्थित सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना शहर स्वच्छतेप्रती नागरिकांचे कर्तव्य आणि मनपाकडून करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली.

आगामी काळात मनपाकडून शहरातील झोपडपट्टीची सुधारणा करण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच उपस्थित संघटनांना मनपाच्या शहर स्वच्छतेच्या व सौंदर्यीकरणाच्या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. याबाबतीत संघटनांच्या नावीन्यपूर्ण कल्पना व अभिप्राय स्वीकारार्हय असल्याचे सांगितले.

यावेळी मनपाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन उपस्थित संघटनांमधील धान्य व घाऊक व्यापारी असोसिएशन यांनी त्यांच्या सर्व सभासदांसाठी कचरादानी (डसबिन) देण्याची घोषणा यावेळी केली. तसेच शहरातील आयमा (एआयएमए) या संघटनेने शहरातील अंबड परीसरात असणार्‍या वारंवार कचरा पडण्याच्या ठिकाणावर (ब्लॅक स्पॉट) वर मनपाच्या सहकार्याने वृक्षारोपण करून राबविलेल्या अभिनव उप्रकमाची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी आयमाच्या वतीने 100 कचरादानी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

या बैठकीत शहरातील वाहतूक समस्या, शहरातील मद्यविक्री दुकानाबाहेर होणारा कचरा, अतिक्रमण आदि बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील मनपाच्या विविध ठिकाणी असणारे चौक, दुभाजक यांची सामजिक निधी (सीएसआर) निधी अंतर्गत तयार करून देण्यास उत्सुक असल्याचे यावेळी उपस्थित संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. यासंबंधित आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या.

सदर बैठकीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना, नाशिक मोटार मर्चंट असोसिएशन, नाशिक सराफ असोशिएशन, निवेक, नाशिक होलसेल व रिटेल क्लोथ मर्चंट, नाशिक मिठाई नमकीन असोसिएशन आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, मनपाचे सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या