Thursday, November 21, 2024
Homeनाशिककृषी पदवी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

कृषी पदवी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Entrance Examination Room) कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांसाठी होणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना (students) 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -

अमरावती जिल्ह्यामध्ये (amravati district) संचारबंदी (curfew) असून इंटरनेट (Internet) सेवाही बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी निर्माण झाल्याने हा बदल करण्यात आला असल्याची माहिती कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप (Commissioner Ravindra Jagtap) यांनी दिली.

दरम्यान कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश अर्ज नोंदणी 5 नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. याची मुदत गुरुवारी संपणार होती. मात्र विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आता ही मुदत 22 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

संपूर्ण प्रवेशाचे वेळापत्रक सुधारित जाहीर करण्यात आले आहे. प्रवेशाच्या तीन यादी जाहीर केल्या जाणार असून येत्या 24 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज करावेत आणि प्रवेशाचे टप्पे लक्षात घ्यावे, असे सीईटी सेलच्या (CET cell) वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वेळापत्रक (Schedule)

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज – 22 नोव्हेंबरपर्यंत मुदत

  • कच्ची गुणवत्ता यादी – 26 नोव्हेंबर

  • कच्च्या गुणवत्ता यादीबाबत आक्षेप नोंदवणे – 27 ते 29 नोव्हेंबर 2021

  • पक्की गुणवत्ता यादी – 3 डिसेंबर

  • पहिली गुणवत्ता यादी – 6 डिसेंबर

  • पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती – 7 आणि 8 डिसेंबर

  • दुसरी गुणवत्ता यादी – 11 डिसेंबर

  • दुसर्‍या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती- 13 आणि 14 डिसेंबर

  • तिसरी गुणवत्ता यादी – 18 डिसेंबर

  • तिसर्‍या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती 20 आणि 21 डिसेंबर

  • शुल्क भरण्याचा कालावधी – 20 ते 22 डिसेंबर

  • रिक्त जागांची माहिती – 24 डिसेंबर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या