Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजनरियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | Mumbai

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) तिला अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने

- Advertisement -

रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी रियाच्या जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने हा अर्ज फेटाळला. रियाला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एनसीबीने कोर्टात रियाच्या जामिनाला विरोध केला. आता रिया आज रात्री घरी जाता येणार नाही. तिला एनसीबीच्या कार्यालयातच रात्री मुक्काम करावा लागणार आहे. तिथून तिची उद्या सकाळी तुरूंगात रवानगी केली जाईल.

एनसीबीने कोर्टात रियाच्या जामिनाला विरोध करत युक्तिवाद केला. रिया चक्रवर्ती या प्रकरणातील आरोपी आहे. तिला जामीन दिल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. रियाने या प्रकरणी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि त्यावर तपास करणं आवश्यक आहे. दुसरीकडे, रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी बाजू मांडली. रियाने चौकशीत सहकार्य केले आहे. या प्रकरणी एनसीबीने रिमांड मागितलेली नाही. कारण एनसीबीने चौकशी पूर्ण केली आहे. रियाने स्वतःहून ड्रग्ज घेतले नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून तिने ते पुरवले आहे. यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे. गरज पडेल तेव्हा ती पुन्हा चौकशीत सहकार्य करेल, अशी बाजू रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी मांडली.

रियाही ड्रग्ज सिंडिकेटची सक्रिय सदस्य आहे, असं एनसीबीने रिमांड कॉपीमध्ये म्हटलं आहे. यानुसार रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिलेली नाही. ती सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज पुरवत होती आणि ती ड्रग्ज पुरवणार्‍यांच्या संपर्कात होती. सुशांतच्या सांगण्यावरून रियाने ड्रग्ज पुरवणार्‍यांना पैसे दिले.

शौविकच्या माध्यमातून ड्रग्ज रियापर्यंत पोहोचत होते. ड्रग पुरवणारे सुशांतचे कर्मचारी सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्याकडे ड्रग्ज पाठवत होते. रियामार्फत ड्रग्ज पुरवणार्‍यांना पैसे दिले गेले. यासाठी सुशांतने पैसे दिले, असं रिमांड कॉपित म्हटलं आहे. रियाने तपासात सहकार्य केले. शौविक, सॅम्युअल, दीपेशकडून कोणतीही ड्रग्ज सापडली नाहीत. अब्दुल बासित परिहार आणि जैद विलात्रा यांच्या मार्फत शौविक चक्रवर्तीने पुरवले होते. सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत हे ड्रग्ज पुरवणार्‍यांकडून ते घ्यायचे. रिया आणि सुशांत त्यासाठी पैसे द्यायचे, असंही रिमांड कॉपित नमूद केलं गेलं आहे.

शौविक किंवा रियाने थेट ड्रग्ज खरेदी केले नाही. दोघेही ड्रग्ज पुरवण्यात नक्कीच भागीदार होते. ड्रग्जसाठी रिया आणि सुशांत दोघेही सामील होते. रिया शौविक, सॅम्युअल आणि दीपेश यांना ड्रग्ज घेण्यासाठी सांगत होती. पैशाचे व्यवहारही बघायची, असं रिमांड कॉपीमध्ये एनसीबीने म्हटलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Raj Thackeray : मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार?

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) दारुण पराभवानंतर संघटनात्मक बांधणी आणि फेरबदलावर लक्ष केंद्रित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा (Gudhi...