Wednesday, October 9, 2024
HomeमनोरंजनRhea Singha : गुजरातची रिया सिंघा ठरली यंदाची Miss Universe India

Rhea Singha : गुजरातची रिया सिंघा ठरली यंदाची Miss Universe India

गुजरातच्या रिया सिंघाने ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ ‘चा किताब पटकावला आहे. रियाने इतर ५१ स्पर्धकांना मागे टाकत अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय.

राजस्थानची राजधानी जयपूर येथे मिस यूनिव्हर्स २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. २०१५ ची मिस यूनिव्हर्स इंडिया ठरलेल्या उर्वशी रौतेलाने रियाच्या डोक्यावर क्राऊन घातला.

- Advertisement -

रिया सिंघाचे वय १८ वर्षे आहे. रिया ‘गुजरात’ची आहे. रियाच्या इंस्टाग्राम बायोत नमूद केल्यानूसार, ती एक अभिनेती आणि एक अनुभवी टेडवक्ती आहे. याआधी रिया सिंघाने ‘द टिन अर्थ २०२३’ हा किताब जिंकला होता. आता पुढच्या वाटचालीत, रिया ‘ग्लोबल मिस युनिव्हर्स २०२४’ मध्ये भारतातचे प्रतिनिधित्त्व करेल.

मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा जिंकल्यावर रिया म्हणाली, आज मी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा जिंकली आहे. मी सर्वांची खूप आभारी आहे. मी इथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या या प्रवासात मला या स्पर्धेच्या आधीच्या विजेत्यांकडून खूप प्रेरणा मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या