Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Accident News : पळसे जवळ अपघात; रिक्षाचालक जागीच ठार

Nashik Accident News : पळसे जवळ अपघात; रिक्षाचालक जागीच ठार

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या पळसे गाव (Palse Village) येथे आयशर ट्रकला रिक्षाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात (Accident) रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…

- Advertisement -

नाशिक-नगरचे पाणी मराठवाड्याला मिळणार? सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव उत्तम भानुदास शेजुळे (वय ४२, रा.जैतूननगर, नाशिकरोड) असे आहे. शेजुळे व त्यांचा मित्र रघुवीर लोहट हे आपल्या रिक्षा क्रमांक एम.एच. १५ एफ. वी. ८९२८ या रिक्षामधून शिंदेगाव जवळ असलेल्या एका धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी जेवण करून हे दोघे रिक्षाने आपल्या घरी येत असताना पळसे गावाजवळ असलेल्या त्रिमुर्ती प्लाझासमोर (Trimurti Plaza) आयशर ट्रक क्रमांक एम.एच. १५ इ.जी. १२४५ या ट्रकला उजव्या बाजूने रिक्षाची धडक बसल्याने सदर रिक्षा पलटी झाली. परिणामी मोठा अपघात होऊन रिक्षाचालक उत्तम शेजुळे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला.

Police Officers Transfer : राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच काही प्रमाणात वाहतूक देखील ठप्प झाली होती. तब्बल अर्धा ते पाऊण तासानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. तसेच सदर घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयत रिक्षाचालक शेजुळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : सारडा सर्कल परिसरात बर्निंग कारचा थरार; ओमनी जळून खाक

- Advertisment -

ताज्या बातम्या