Tuesday, May 28, 2024
Homeजळगावचारचाकीच्या धडकेत रिक्षाचालक तरुण ठार

चारचाकीच्या धडकेत रिक्षाचालक तरुण ठार

जळगाव jalgaon | प्रतिनिधी

भरधाव चारचाकीने four-wheeler collision मालवाहू रिक्षाला Rickshaw मागून धडक दिल्याने चालक भरत उखा ढोकणे (वय ३४,रा.मालदाभाडी, ता.जामनेर) या तरुणाचा जागीच मृत्यू killed झाला असून वाहनातील सुनील अभिमन्यू शार्दूल (वय ३०, रा.जामनेर) हा जखमी झाला आहे. गुरुवारी दुपारी ७ वाजेच्या सुमारास हा जळगाव तालुक्यातील उमाळा ते चिंचोली Umala to Chincholi दरम्यान हा अपघात झाला.

- Advertisement -

अपघातानंतर जखमीने कारची चाबी हिसकावून घेतली असता, कारमधील मध्यधुंद तरुणांनी त्यास मारहाण करुन चाबी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक जमल्यानंतर मारहाणीच्या भितीने चौघांनी कार सोडूनच घटनास्थळावरुन पळ काढला.

मूळ जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील रहिवासी भरत ढोकणे हा तरुण काही दिवसांपासून जामनेर येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. गुरुवारी भरत हा याचा जामनेर येथील फर्नीचरचे काम करणारा मित्र सुनील शार्दूल हा फर्निचरचे साहित्य घेण्यासाठी जळगावला आला होता. एमआयडीसीतून साहित्य घेतल्यानंतर ते जामनेरला घेवून जाण्यासाठी सुनील याने भरत यास फोन केला. भरत याच्या मालवाहू रिक्षात सामान भरल्यानंतर दोघेही जामनेरकडे जात होते.

यादरम्यान चिंचोलीजवळ भरधाव कार क्रमांक एम.एच. १९. ए.पी.४६९६ ने भरत याच्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, सामानासह रिक्षाने तीनवेळा पलटी झाली. चालक भरत हा रिक्षाच्या बाहेर फेकला जावून त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनील हा जखमी झाला. सुनील याने त्याच्या मोबाईलवरुन अपघाताची माहिती त्याच्या जळगावातील नातेवाईकांना दिली. तोपर्यंत इतर वाहनधारकांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भरत यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघातानंतर कारसोडून तरुण पसार

अपघातानंतर कारचालक व कारमधील तरुण पसार होण्याच्या तयारीत होते. यादरम्यान सुनील याने कारची चाबी काढून घेतली. ही चाबी संबंधित तरुणांनी मारहाण करुन हिसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र चाबी न मिळाल्याने तसेच गर्दी जमून मारहाणीच्या भितीने संबंधितांनी कार सोडून घटनास्थळावरुन पसार झाले.

दरम्यान जखमी सुनील याने कारची नंबरप्लेट पोलिसांना देण्यासाठी रुमालात बांधून सोबत आणली होती. जखमी सुनीलवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत भरत याच्या पश्‍चात आई मंगला, पत्नी विद्या, भाऊ दिपक व वडील उखा काशिनाथ ढोकणे असा परिवार आहे. आई वडील दोघेही मालदाभाडी येथे शेती करतात. तर दिपक याची चायनीजची गाडी असून तो मोठा भाऊ भरत याच्यासोबत जामनेरला राहत होता.

भावाच्या अपघाती मृत्यूने दिपकला मोठा धक्का बसला होता. त्याने जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी उशीरापर्यंत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या