Thursday, November 5, 2026
HomeनगरCrime News : दोडक्याच्या पिकात गांजाची लागवड; 15 लाख 36 हजारांचा मुद्देमाल...

Crime News : दोडक्याच्या पिकात गांजाची लागवड; 15 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील वाशेरे शिवारात दोडक्याच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोले पोलिसांनी छापा टाकून 15 लाख 36 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, याप्रकरणी शेतजमिनीचा वाटेकरी विजय रघुनाथ गजे (रा. वाशेरे, ता. अकोले) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

अकोले शहरातील शेकईवाडी येथील सिताराम सुरेश गायकवाड यांची वाशेरे शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीत वाटेकरी असलेल्या विजय गजे याने दोडक्याचे पीक घेतले होते. मात्र, या पिकात गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन व जोपासना केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस हेडकॉन्स्टेबल रवींद्र वाकचौरे, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे, तोरकडी, सुहास गोरे, महेंद्र गुंजाळ आणि मनोहर मोरे यांच्या पथकाने एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार वाशेरे शिवारातील गायकवाड यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी दोडक्याच्या बागेत गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी गांजाची हिरवी पाने व संबंधित मुद्देमाल असा एकूण 15 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी विजय रघुनाथ गजे याच्याविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(ब), 20(अ) आणि 20(ब)(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप हजारे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

३ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

0
पुणे | प्रतिनिधी Pune थायलंडमधून पुण्यात आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी ३ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा १० किलो ६४२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा...