त्र्यंंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar
टाळ-मृदुंगाच्या गजराने आणि विठुनामाच्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंंबकेश्वर मार्ग दुमदुमून गेले आहे. विठ्ठल-रखुमाई, निवृत्तिनाथ महाराजांच्या प्रतिमेच्या रथासह वारकर्यांच्या दिंड्यांचे रथ अशी मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पाहायला मिळाली. तसेच ब्रह्माव्हॅली येथे वारकर्यांनी फुगडीचा आनंद घेत रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून त्र्यंंबकेश्वर नगरीत दाखल होत आहेत. शनिवारी निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा भरत असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्यने दिंड्या त्र्यंंबकरोडने त्र्यंंबकेश्वरच्या दिशेने प्रस्थान करताना दिसून येत होत्या.
राज्यभरातून सुमारे 400 दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. शहरातून त्र्यंंबकेश्वरकडे प्रस्थान करणार्या दिंड्यांच्या स्वागतासाठी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने ठिकठिकाणी वारकर्यांचे स्वागत करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा