Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनरिंकू राजगुरू दिसणार हिंदी चित्रपटात

रिंकू राजगुरू दिसणार हिंदी चित्रपटात

मुंबई – Mumbai

‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचा अभिनयाचा मोर्चा अता हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळवला आहे.

- Advertisement -

रिंकूने सैराटच्या यशानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘सैराट’ फेम आर्ची आता ‘हंर्डेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर ॲमेझॉनवरील ‘अनपॉज्ड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुरुवारी ऍमेझॉन प्राइमने ‘अनपोज्ड’ या पाच शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज केला.

या चित्रपटात रिंकू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गुरुवारी अ‍ॅमेझॉन प्राइमने ‘अनपॉज्ड’चा टीझर रिलीज केला. ‘अनपॉज्झ’मध्ये पाच शॉर्ट फिल्म्स एकत्र असणार आहेत.

सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा पाच गुणवंत दिग्दर्शकांनी दिग्शर्दित केलेल्या शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत. 18 डिसेंबरला हा वोगळ्या थाटणीचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...