Friday, May 3, 2024
Homeजळगावयावलला 14 आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा

यावलला 14 आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा

यावल Yaval प्रतिनिधी 

शहरातील विरार नगर भागात एकाच समाजातील दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात लोखंडी दांडाने मारहाण शिवीगाळ जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात याबाबत दंगलीच्या (Riot case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलासह 14 आरोपीतांविरुद्ध (accused) दंगलीचा गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीचा आयशर चालक ठरला बळी

पहिल्या गुन्ह्यात नर्सिंन मुस्ताक पटेल, रा. विरार नगर यांच्या फिर्यादी वरून दिनांक 17 मार्च 23 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका महिलेसोबत फिर्यादी नरसिंग पटेल यांचा किरकोळ वाद सुरू होता. त्यावेळी पप्पू पटेल यास वाटले की मी त्यांच्या मुलीची बदनामी करीत आहे तेव्हा आमीन पटेल यांचा सासरा पप्पू छोटू पटेल हा त्या ठिकाणी आला व त्याने शिवीगाळ करीत माझे समक्ष त्याचे कपडे काढून अंडर पॅन्ट वर आला.

त्यावेळी मुस्ताक पटेल याबाबत विचारपूस करत असताना आमीन पटेल रफिक पटेल रज्जाक पटेल शनो रज्जा, पटेल त्यावेळी मुस्ताक पटेल हे त्या ठिकाणी आले व ते काय झाले याबाबत विचारपूस करत असताना आम्हीं पटेल रफिक पटेल रज्जा पटेल,शन्नू  रजा पटेल,टीना अनिस पटेल राहणार सर्व विरार नगर असे सर्वजण आरडाओरड करीत आले. त्याच वेळी फिर्यादी यांचा मुलगा बाबा पटेल पुतण्या अरबाज पटेल असे आम्हाला पाहून त्या ठिकाणी आले व भांडण आवरत होते.

त्यावेळी रफिक रज्जाक पटेल यांनी त्याची हातातील लाकडी दंड्याने फिर्यादी यांचे पती मुस्ताक पटेल यांचे पाठीवर उजव्या बाजूस मारहाण केली. आमीन पटेल यांनी जमिनीवर दगड उचलून बाबा यास डोक्यावर व गालावर मारहाण केली. रज्जाक शकूर पटेल यांनी पुतण्या अरबाज पटेल या चापट बुक्क्यांनी मारहाण केली तसेच  शन्नू  पटेल ,टीना पटेल या दोघींनी फिर्यादी यांच्या पतीला चापटा बुक्यांनी मारहाण केली व सर्व लोकांनी शिवीगाळ करीत रज्जाक पटेल हे घरात घुसून तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी दिली .

सदर भांडण फिर्यादी यांचा पुतण्या गुड्डू पटेल जेठ रज्जाक पटेल व आरिफ पटेल आणि सिकंदर पटेल यांनी सोडवा साोडवी केली. या घटनेवरून फिर्यादी नरसिंन पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग पाच गुरं नंबर 92 भारतीय दंड संहिता 1860 ची कलम 509 ;143; 147; 148; 324 ;323; 504; 506 नुसार पप्पू पटेल अमीन पटेल रफिक पटेल रज्जाक पटेल , शन्नू पटेल टीना पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीतांविरुद्ध यावल पोलिसांनी कारवाई केली आहे .

कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आगभडगाव शहरासह तालुक्यात सर्रास अवैध वृक्षतोड

तर दुसऱ्या गटातील शन्नू रज्जाक पटेल यांच्या  फिर्यादीवरून गुरं 93 भादवि कलम 143 ;147 ;148 ;324; 504 ;506 नुसार यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

यात दिनांक 17 मार्च 23 रोजी रात्री आठ वाजेची सुमारास फिर्यादी  , शन्नो पटेल या त्यांच्या घरासमोर उभी असताना नरसिंन मुस्ताक पटेल फिर्यादी यांची सून न मीरा अमिन पटेल हीच शिवीगाळ करीत फिर्यादी यांचे घरासमोर आली तेव्हा, फिर्यादी, बोलली की, माझ्या सुनेला शिवीगाळ का करीत आहे? त्यावेळी नरसिंन , पटेल ची ननंद हिना पटेल ही त्या ठिकाणी आली व फिर्यादी व व त्यांच्या पती शिवीगाळ करत होती.

त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा रफिक पटेल हा त्या ठिकाणी आला व नजसरीन पटेल व हिना पटेल यांना बोलला की तुम्ही माझ्या आई वडिलांना , शिवीगाळ का करीत आहे?, असे बोलण्याचा राग येऊन नियाज अहमद हिलाल पटेल,गुड्डू राज्यक पटेल ,अरबाज रज्जाक पटेल ,मुस्ताक इसामु पटेल बाबा मुस्ताक पटेल त्या ठिकाणी आले तेव्हा अरबाज पटेल व   एकव अल्पवयीन मुलगा तसेच मुस्ताक इसामु पटेल यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादी यांचा मुलगा रफिक यास डाव्या हातावर मारहाण केली . नियाज पटेल यांनी टीना पटेल ही शिवीगाळ करून गटारी  मध्ये ढकलून दिले.

रज्जाक पटेल नरसिंन पटेल ,यांनी सर्वांना जमिनीवर पाडून पाडून मारा अशी धमकी दिली होती. या कारणावरून   शन्नू पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रज्जाक इसामु पटेल नियाज अहमद , हिलाल पटेल गुड्डू राज्याक पटेल अरबाज रज्जाक पटेल मुस्ताक इसामु पटेल आणि एक अल्पवयीन मुलगा तसेच नर्सिन मुस्ताक पटेल हिना हिलाल पटेल सर्व राहणार विरार नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

,वरील गुन्ह्याच्या संदर्भात यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल असलम खान हे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या