Tuesday, March 25, 2025
Homeनगरजांभळी येथील युवक नदीपात्रात बुडाला

जांभळी येथील युवक नदीपात्रात बुडाला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील जांभळी येथे मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये येणार्‍या काळू नदी पात्रात अनिल चिमाजी आघान हा 22 वर्षीय युवक बुडाल्याची घटना दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती. 24 तासांनंतर नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात यश आले. राहुरी तालुक्यातील जांभळी येथील बन्सीची वाडी येथे राहणारा अनिल आघान हा वनकुटे, ता. पारनेर हद्दीतील काळुची वाडी येथे नातेवाईकांकडे गेला होता. दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता अनिल आघान हा तरुण परत घरी येत असताना तो आंघोळ करण्यासाठी काळु नदी पात्रावरील पुलावर थांबला.

- Advertisement -

नंतर त्याने पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो गटांगळ्या खात वाहून गेला. त्यानंतर तरुणांनी आरडोओरडा करीत पाणबुड्यांना बोलविण्याचा प्रयत्न केला. अनिल आघान याचे मित्र सुनील आघान, सुभाष केदार, संदीप भले यांनी पाण्यात उडी घेत अनिल आघान याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. अनिल आघान हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वावरथचे माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळीचे सरपंच शौकत शेख यांनी प्रशासनाला माहिती देत मदतीचे आवाहन केले. घटनास्थळी सागर बाचकर, किरण जाधव यांसह वावरथ, जांभळी परिसरातील तरुण मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत तरुणाचे शोधकार्य सुरूच होते.

अखेर घटनेच्या 24 तासांनंतर काल दि. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान पाण्यात वाहून गेलेला अनिल आघान या तरुणाचा शोध घेण्यात यश आले. परिसरातील तरुणांनी अनिल आघान याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...