Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारसातपुड्यातील नद्या नष्ट होण्याच्या मार्गावर

सातपुड्यातील नद्या नष्ट होण्याच्या मार्गावर

अक्कलकुवा । श. प्र. nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत (Satpura Mountains) रांगांतून प्रवाहित होणार्‍या 50 हुन अधिक लहान मोठ्या नद्या असून या नद्यांचे रूपांतर आता नाल्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. कधीकाळी स्थानिक नागरिकांची तहान भागवणार्‍या या नद्यांना आता गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा, तापी या दोन प्रमुख नद्या असून उमाई, गोमाई, पातळगंगा, रंगावली आणि सातपुड्यातून वाहणार्‍या या नद्या अनेक गावांची तहान भागवत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या नद्यांमध्ये शहरी भागातील सांडपाणी घनकचरा, सोडल्याने या नद्या आता प्रदूषित झाल्या असून त्यांचे रूपांतर आता नाल्यात होताना दिसत आहे.

शहरी भागातील वाढत्या प्रदुषणाचा प्रभाव आता नद्यांवर देखील व्हायला लागला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे शहरी भागातील सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडण्यात येत असते. या प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे नद्यांमध्ये असलेल्या मासे आणि सूक्ष्म जीव नष्ट होण्याच्या मार्गावर असून अनेक जीव आणि पाण्यातील औषधी वनस्पती नामशेष झाले आहेत. एकिकडे सरकार नदी सफाईच्या नावाने अनेक योजना राबवत असून नदी सफाईवर कोटींची उधळण करत आहे. मात्र सातपुड्यातील जीवनदायीनी असलेल्या नद्या आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या नद्यांची आता सफाई करून पूर्वोत्तर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या