Friday, June 21, 2024
Homeनगररस्ता अपघातातील जखमी पंचायत समिती माजी महिला सदस्याचा मृत्यू

रस्ता अपघातातील जखमी पंचायत समिती माजी महिला सदस्याचा मृत्यू

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

- Advertisement -

एकलहरे-कोल्हार रस्त्यावर शनिवारी सकाळी दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान लोणी रुग्णालयात मृत्यू झाला. कमलताई भाऊसाहेब लोंढे ( वय 57, रा.कोल्हार खुर्द ता.राहुरी) असे मुत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

कोल्हार खुर्द येथील सामाजिक कार्यकर्त्या व राहुरी पंचायत समितीच्या त्या माजी सदस्या होत्या. पतीसोबत श्रीरामपूरकडे एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना एकलहरे गावानजिकच्या पुलावर बेलापूरच्या दिशेने येणार्‍या दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी कोणताही विलंब न करता रिक्षातून श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालयात पाठविले.

त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने लोणी येथे हलविण्यात आले. मात्र रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्वात पती, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात कोल्हार येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावाजवळील पुलाला कठडे नसून गायब झाले आहेत. पुलाची दोन्ही बाजूची धोकादायक परिस्थिती बनलेली असताना देखील प्रशासनाला जाग येणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला असून अजूनही किती बळी घेणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या