Saturday, July 27, 2024
Homeनगररस्त्याच्या अर्धवट कामामुळे बस उलटताना थोडक्यात बचावली; 45 विद्यार्थी सुखरूप

रस्त्याच्या अर्धवट कामामुळे बस उलटताना थोडक्यात बचावली; 45 विद्यार्थी सुखरूप

अकोले |प्रतिनिधी| Akole

शनिवार-रविवारची सुट्टी पाहून भंडारदरा परिसरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ठाणे येथून आलेली बस अरुंद व अपूर्ण रस्त्यामुळे रस्त्याच्या खाली उतरली, मात्र सुदैवाने ती उलटण्यापासून थोडक्यात बचावली, त्यामुळे 45 विद्यार्थी बचावले. अपूर्ण व अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने एका बाजुला रस्त्याचे काँक्रीटीकरण केले असून दुसरी बाजू खोदून ठेवली आहे. भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत असल्याने सर्वचे सर्व पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. पर्यटकांकडे स्वतःचे वाहन असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी कायमस्वरुपी होत आहे. रस्ता एका बाजुने सुरू आहे.

दुसर्‍या बाजुने खोदलेल्या रस्त्यामध्ये मोठे चारचाकी वाहन बसत नसल्याने वाहनाच्या टायरचे मोठे नुकसान होत आहे. काही पर्यटक काँक्रिटच्या रस्त्यावरून दोन्ही बाजुने वाहने नेतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. या रस्त्याचे काम अहमदनगर येथील एका ठेकेदारास दिले आहे. शेंडी येथेही भरचौकात एका बाजुला रस्ता अपूर्ण ठेवल्याने याही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसर गजबजुन गेला आहे. स्पील वे गेट वर असलेले कर्मचारी रमेश सोनवणे ड्युटीवर असताना त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उतरल्याचे पाहिले. राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांना माहिती समजतात ते घटनास्थळी हजर झाले. पो. कॉ. अशोक गाडे व त्यांचे सहकारी यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास मदत केली. ठेकेदाराने हा रस्ता खोदताना पावसाळा तसेच पर्यटनात होणारी गर्दी लक्षात घेता काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या