Monday, November 25, 2024
Homeधुळेमहिलांनी पाडले रस्त्याचे काम बंद

महिलांनी पाडले रस्त्याचे काम बंद

धुळे dhule। प्रतिनिधी

शहरातील देवपूर परिसरातील एकता नगरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी (water) येत नसल्याने महिलांनी (women) रस्त्याचे काम (road work)बंद (stopped) पाडत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यां महिलांची समजूत काढल्याने अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

शहरातील देवपूर परिसरातील पांझरा नदी किनारी असलेल्या एकता नगरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करीत असतांना पिण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व तुटला. त्यामुळे या भागातला पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळालेले नाही.

त्यामुळे संतप्त महिलांनी काल सायंकाळी हंडे घेत रस्त्यावर आंदोलन सुरू केले. रस्ता कामामुळे पाणी मिळत नाही, त्या रस्त्याचे कामच बंद पाडले. परिणामी रस्त्यावर खडी दाबण्याचे काम करणार्‍या रोलरचा चालक रोलर थांबवून तेथून निघून गेला. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नाही. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधला तरी कोणीही समस्या ऐकत नाही. त्यामुळे आम्हाला पाणी द्यावे, मगच रस्त्याचे काम करावे, असे म्हणत महिला आक्रमक झाल्या होत्या.

दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्याने देवपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने या आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनात सुशीला सोनार, मिनाबाई जाधव, सखुबाई जिरे, पल्लवी गवळे, अनिता पेटकर, शांताबाई परदेशी, लिलाबाई लोणारी, शोभाबाई अहिरे व परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या